पुणे
Madhu kambikar dies मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककलेच्या क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर याचं पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. यांच्या निधनाने मराठी कलाविश्वातील एक प्रभावी पर्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
२७ नोव्हेंबर २०१६ रोजी लावणीच्या कार्यक्रमानंतर त्यांना पक्षाघाताचा (स्ट्रोक) झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचेही त्या वेळच्या वृत्तांत नमूद होते.त्यानंतर त्या अंथरुणावर खिळूनच होत्या.
‘शापित’ या चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयाने त्यांना विशेष ओळख मिळाली. ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अस्सल लावणी, सहज अभिनय आणि ग्रामीण स्त्रीजीवनाचे प्रभावी चित्रण ही त्यांच्या कलेची वैशिष्ट्ये होती.
आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
मागील आठवड्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि त्यानंतर आज मधू ताई यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककलेची मोठी हानी झाली आहे.
