women murderd आणि खुनाला वाचा फुटली!

women murderd
women murderd

आणि खुनाला वाचा फुटली!जमिनीच्या वादातुन ४२ वर्षीय महिलेचा खुन

kada,

in article

women murderd गेल्या 3 -4  महिन्यापूर्वी  वटनवाडी येथील महिला अचानक बेपत्ता झाली होती. तिचा तिच्या नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र महिला आढळून आली नाही.  तब्बल चार महिन्यांनी तिचा शोध लागला आहे.

वटणवाडी येथील  एका ४२ वर्षीय महिलेचा जमिनीच्या वादातुन खुन करून मृतदेह जमिनीत गाढुन पुरावा नष्ट केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस येताच तिघाजणांना आष्टी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मयत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून भरत गायकवाड, प्रल्हाद घुमरे, सुनिल गांगर्डॅ याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मंदा  गायकवाड असे खुन करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

हेही वाचा –झुंड व्यवस्थेने नाकारलेल्यांची अस्वस्थ गोष्ट

आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील मंदा हिराभाऊ गायकवाड वय ४५ वर्ष हिला भावकीतीलच भरत गायकवाड व जावई प्रल्हाद घुमरे, आणि त्याचा मित्र सुनिल गांगर्डॅ हे सतत महिलेला फोन करून व प्रत्यक्ष भेटुन जमिन आमच्या नावावर कर असा तगादा लावत जिवे मारण्याची  धमकी द्यायचे .यातुनच त्यानी ३ नोव्हेंबर २०२१ रोजी सदरील महिलेला रात्री शेतात तुरीला पाणी देण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन तिचा खुन करून मृतदेह जमिनीत पुरून टाकल्याचे  बुधवारी निष्पन्न होताच मयत महिलेचा भाऊ केरू किसन चितळे याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात यातील आरोपी भरत पोपट गायकवाड रा.वटणवाडी, प्रल्हाद  नवनाथ घुमरे, सुनिल पंढरीनाथ गांगर्डॅ दोघे रा. घाटापिंपरी यांच्या विरोधात    खुन व मृतदेह नष्ट करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही आरोपीना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.

 

women murderd आरोपींना अटक

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here