Jhund Movie Review in Marathi I झुंड व्यवस्थेने नाकारलेल्यांची अस्वस्थ गोष्ट

Jhund Movie Review in Marathi
Jhund Movie Review in Marathi

 

 

in article

झुंड फिल्म review

दिग्दर्शक  :नागराज मंजुळे

कलाकार –  अमिताभ बच्चन, रिंकू राजगुरु, आकाश थोसर, किशोर कदम, तानाजी गालगुंडे, सोमनाथ अवगाढे, विकी काडियन, गणेश देशमुख इत्यादी .

 

 

Jhund Movie Review in Marathi चित्रपटातील एक डायलॉग चित्रपटातील सर्व काही गोष्टी सांगून जातो.एका व्यक्तीने झोपडपट्टीतील मुलांचे जीवन बदलून टाकणारी काहीसी ही गोष्ट आहे.मराठीतील चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी बीग  बी  अमिताभ बच्चन यांना घेऊन पहिल्यांदा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे.

 

चित्रपटाच्या सुरुवातीला एक भिंत दिसते हेच यांचे विश्व. या भिंतीच्या पलीकडे कधीही न जाणार्या झोपडपट्टीतील मुलांना एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणारी विजय बारसे  यांची ही कथा आहे. त्यासाठी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका त्याला लाभली आहे.

Jhund Movie Review in Marathi गेल्या अनेक वर्षापासून झुंड रेंगाळला होता. 4 मार्च रोजी हा रिलीज होत आहे.

चित्रपटातील कथानक हे एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची कहाणी आहे. एका निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या विजयने झोपडपट्टीतील मुलांच्या जीवनात घडवलेला बदल चित्रित केला आहे. एका झोपडपट्टीतील तरुण ज्यांच्या प्रचंड ताकद आहे, अशा हाताना आणि मनाला गुन्हेगारीच्या  कामात लागलेले असताना त्यांना फुटबाल सारख्या खेळात ओढून फुटबाल मध्ये परिवर्तीत करण्याचे काम विजय बारसे करतात.

नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘पुष्पा’ भलेही खूप गल्ला घेऊन गेला असला तरी त्यातील विध्वंशी प्रवृत्ती, नशेचा अति चित्रण आणि व्यसनाला प्रोत्साहन देणारी दृश्ये यापेक्षा या चित्रपटातील मुलांना विघातक कडून विधायक कामाला लावणारी झुंड ची स्टोरी आहे.

दुर्लक्षलेल्या व्यवस्थेने  नाकारलेल्या  माणसांची ही गोष्ट आहे. ते तसे सुखात असतात. चांगले वाईट पाप पुण्य याची जाणीव नसलेल्या या भिंतीपलीकडच्या माणसाना चित्रित करण्याचा प्रयत्न या मधून झाला आहे.

चित्रपटातील रिंकू राजगुरू हिची भूमिका अमिताभ सह महत्वाची आहे. सैराट फेम आकाश ठोसर याचाही रोल महत्वाचा आहे. एकूणच या चित्रपटामुळे समाजाच्या विधायक बदलांवर प्रकाश टाकणारे कथानक रसिकांच्या मनाला किती भावते हे त्याच्या विक्रीवरून लक्षात येईलच.

 

ipl 2022 schedule मुंबईत २६ मार्चपासून आइपीएल 2022 चे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here