भारतात Royal Enfield कंपनीच्या बुलेट या गाड्यांची क्रेझ आहे. तसेच युवक वर्गातून या बाईक ला चांगली मागणी असल्याने आज या कंपनीच्या वतीने Royal Enfield Classic 350 ही गाडी बाजारात आणण्यात येणार आहे. नवीन मॉडेल हे j प्लेटफार्म वर आधारित असून या गाडीचे इंजिन लुक आणि याच्या दमदार कामगिरी मुळे युवकांसाठी आकर्षण बनली आहे.
कोणते फीचर्स यामध्ये असणार
Royal Enfield Classic 350 या बाईक ला एक सीट किंवा दोन सीट सह बाजारात उपलब्ध होणार आहे. जुन्याच मॉडेल प्रमाणे हे मॉडेल असणार आहे. मात्र यामध्ये सर्कुलर हेडलैंप, क्रोम-प्लेटेड एग्जॉस्ट, राउंड-शेप्ड रियर-व्यू मिरर, एक टियरड्रॉप शेप्ड फ्यूल टैंक चा समावेश आहे. याच बरोबर नवीन दर्जाचे कुशन आणि टेल लंप असणार आहे.
११ वेगवेळ्या कलर मध्ये बाईक होणार लांच
Royal Enfield Classic 350 बाईक एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 11 वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. यामध्ये क्रोम रेड, क्रोम ब्रॉन्ज़, डार्क स्टील्थ ब्लैक, हैल्सियन ग्रीन, हैल्सियन ब्लैक, हैल्सियन ग्रे, रेडडिच सेज ग्रीन, डेजर्ट सैंड, रेडडिच रेड, डार्क गनमेटल ग्रे और मार्श ग्रे या रंगाचा समावेश आहे.
कसे असणार या गाडीचे इंजिन
नव्या Royal Enfield Classic 350 बाईक मध्ये 349cc चे इंजिन असणार आहे. सिंगल-सिलेंडर फ्यूल इंजेक्टेड एयर-एंड ऑयल-कूल्ड इंजिन यामध्ये असू शकते. या बाईक मध्ये तुलनेने कमी व्हायब्रेशन असणार आहे.तर या बाईक ला 5 गिअर असणार आहेत.
आणखी वाचा : भावना पटेल ने सिल्वर पदक जिंकले
या बाईकची बाजारात किंमत एक्स शो रूम एक लाख ८६ हजार ते एक लाख ९६ पर्यंत जाऊ सकते.