Home ताज्या बातम्या ahilyanagar madhi holi 2026:गोपाळ समाजाने पेटवली मानाची होळी

ahilyanagar madhi holi 2026:गोपाळ समाजाने पेटवली मानाची होळी

1
49
ahilyanagar madhi holi 2026
ahilyanagar madhi holi 2026

ahilyanagar madhi holi 2026 सुमारे चारशे वर्षांची ऐतिहासिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या राज्यातील गोपाळ समाजाच्या श्री क्षेत्र मढी येथील मानाची होळी सोमवारी (दि. २) शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पेटविण्यात आली. परंपरेनुसार या दिवशी मढी गावातील ग्रामस्थ होळी साजरी करत नाहीत.होळी प्रज्वलित होताच गोपाळ बांधवांनी नाथांचा जयजयकार करत होळीभोवती प्रदक्षिणा घालून श्रद्धाभाव व्यक्त केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने गोपाळ समाजबांधव या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

सायंकाळी गोपाळ बांधव वाजत-गाजत व कडेकोट पोलिस बंदोबस्तात मानाच्या गोवऱ्या घेण्यासाठी कानिफनाथ गड येथे दाखल झाले. या वेळी देवस्थान समितीच्या वतीने समाजातील मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानित मानकऱ्यांमध्ये माणिक लोणारे (येवला, ता. जि. नाशिक), नामदेव माळी (चिखली, ता. गेवराई, जि. बीड), रघुनाथ काळापहाड (धारवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर), हरिभाऊ हंबीरराव (बेलगाव, ता. गेवराई, जि. बीड), भागीनाथ नवघरे (कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) तसेच ज्ञानेदेव गव्हाणे(गीऱ्हे) (गोपाळ वस्ती, शिरूर, पुणे) यांचा समावेश होता.

समाजाचे मानकरी ज्ञानदेव गव्हाणे (गिऱ्हे) यांना होळीच्या पारापर्यंत गोवऱ्या डोक्यावर घेऊन मिरवण्याचा मान आहे. परंपरेनुसार त्यांनी नाथांच्या मंदिरापासून गोवऱ्या डोक्यावर घेतल्या. गडावरून वाजत-गाजत मिरवणुकीतून या गोवऱ्या दत्त मंदिराजवळील नियोजित स्थळी आणण्यात आल्या.

ahilyanagar madhi holi 2026 मानाची होळी


दत्त मंदिर परिसरात पोलिस प्रशासनाच्या वतीने बॅरिकेडिंग करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता गोवऱ्या नियोजित स्थळी पोहोचल्या. त्यानंतर मानकरी गोलाकार बसले. विधीपूर्वक पूजा पार पडल्यावर पारंपरिक पद्धतीने होळी प्रज्वलित holika dahan करण्यात आली. कानिफनाथाच्या मंदिराच्या गड बांधणीसाठी दगडी व चुन्याचे काम गोपाळ समाजाने केले म्हणून हा होळी पेटवण्याचा मान या गोपाळ समाजाला देण्यात आला आहे.

यावेळी तालुका प्रशासनाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार किशोर सानप, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, मंडल अधिकारी प्रमोद कटारनवरे उपस्थित होते. तसेच झेंडू पवार, विलास गायकवाड, डॉ. प्रकाश गायकवाड, युवराज पवार, धर्मराज गव्हाणे, आबांदास धनगर, कैलास पवार, नवनाथ जाधव, संदीप धनगर, एकनाथ पवार, प्रकाश सावंत, प्रा. दयाराम गव्हाणे, गोरक्ष गव्हाणे, बबलू सावंत, बालासाहेब जाधव, विलास गव्हाणे यांच्यासह राज्यभरातून आलेले गोपाळ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संपूर्ण सोहळा holi celebration in madhi शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता. गोपाळ समाजातील बांधवांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव साजरा करत यात्रेच्या प्रारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झेंडू पवार यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.

मढी देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, सरचिटणीस माधुरी मरकड, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, कार्याध्यक्ष महादेव कोकाटे, विश्वस्त उत्तम मरकड, मदन मरकड, उषा मरकड,तानाजी शिंदे माजी सरपंच भगवान मरकड, रवींद्र आरोळे डॉ. विलास मढीकर, डॉ. रमाकांत मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड आदी उपस्थित होते.

What is Madhi Yatra?

Madhi Yatra is a famous annual religious pilgrimage held at Kanifnath Temple in Madhi village, located in Maharashtra’s Ahmednagar district. The yatra is dedicated to Kanifnath, one of the revered saints of the Nath sect.
Every year, lakhs of devotees from across Maharashtra and neighboring states gather to seek blessings, offer prayers, and participate in religious rituals. The yatra usually takes place during the Hindu month of Phalguna (February–March) and continues for several days.
The event is marked by:
Traditional पूजा and aarti ceremonies
Devotional singing (bhajans and kirtans)
A large religious procession (palkhi)
A vibrant fair with local shops, food stalls, and cultural activities
Madhi Yatra holds deep spiritual and cultural importance for devotees, especially followers of the Nath tradition, and is considered a powerful occasion for fulfilling vows and seeking divine blessings.

मधी यात्रा म्हणजे काय?

मढी हे नाथ संप्रदायातील कानिफनाथांचे समाधी स्थान. जिथे अठरा पगड जातीचे लोक एकत्र येऊन होळीच्या सणापासून ते थेट गुढीपाडवा पर्यंत यात्रा उत्सव साजरा करतात. इथे दोन मुख्य यात्रा असतात एक म्हणजे रंग पंचमीच्या दिवशी भरणारी यात्रा आणि दुसरी फुलार बाग.ही दुसरी यात्रा गुढी पाडव्याच्या दिवशी असते. एकूणच रंगोत्सव आणि धार्मिक उत्सव असतो. इथे भटक्या जातींच्या जात पंचायती भरत.तसेच मोठा गाढवांचा बाजारही भरतो.

मढी यात्रेत होळी पेटविण्याचा कोणाचा मान असतो ?

मढी यात्रेत होळी पेटविण्याचा गोपाळ समाजाचा मान असतो. देवस्थानच्या वतीने त्यांना मानाच्या पाच गोवऱ्या दिल्या जातात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते आणि होळी पेटविली जाते.या दिवशी मढी गावात कोणीच होळी पेटवत नाहीत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!