पुणे, दि. १३ जुलै :
Pune saswad jejuri dindi truck accident सासवड–जेजुरी मार्गावर बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर सोमवारी भीषण अपघात झाला. या अपघातात वारीसाठी आलेल्या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर चार महिला जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर यांच्या दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील महिला वारकरी यांच्यात हा अपघात झाला. अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून चार महिला जखमी झाल्या आहेत.
जखमी महिलांना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.



