पालखी सोहळ्याकरीता ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे रुग्णवाहिका व पाण्याचे टँकर रवाना

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुढाकार ; उपक्रमाचे ३७ वे वर्ष
तीन पालख्यांसोबत सुसज्ज रुग्णवाहिका, डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवेची विनामूल्य सोय

पुणे :

pune dagdusheth halwai ganpati trust distributes waterand medical for dindi palkhi संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज,जगद््गुरु तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासोबत वारक-यांच्या सेवेकरीता तीन सुसज्ज रुग्णवाहिका श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने पुण्यातून रवाना झाल्या. याशिवाय वारक-यांच्या सेवेत पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील पाठविण्यात आले. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून मोठया प्रमाणात डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येणार आहे.

गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करुन या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ट्रस्टचे उपाध्यक्ष व उपक्रमाचे नियोजन करणारे डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह पदाधिकारी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा ३७ वे वर्ष आहे.

डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे म्हणाले, कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणा-या वारक-यांच्या आरोग्याची काळजी घेत, आवश्यक आरोग्यविषयक सेवा त्वरीत मिळाव्यात, याकरीता या उपक्रमाचे आयोजन केले जाते. सासवड मार्गे जाणा-या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत, लोणीमार्गे जाणा-या संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यासोबत या रुग्णवाहिका असणार आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सहयोगी वैद्यकीय संस्थांतर्फे पालखी सोहळा ज्या ज्या ठिकाणी मुक्कामास असतो, तेथे फिरता दवाखाना देखील चालविला जातो. यामध्ये त्वचा रोग, कान नाक घसा, नेत्र तपासणी, रक्तदाब, शर्करा तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येतात. तसेच औषधोपचार विनामूल्य दिला जातो. हजारो वारकरी दरवर्षी या आरोग्य सेवेचा लाभ घेतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles