पिकअप व मोटारसायकल अपघातात महिला जागीच ठार

 अकोले

 

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कडा सह.साखर कारखानाजवळ पिकअप व मोटारसायकल अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली.

in article

 

Preganancy Bible पुस्तकावरून करीना कपूर खान वादाच्या भोवऱ्यात;विरोधात तक्रार दाखल

आष्टीवरुन -कड्याकडे जाताना दुचाकीला पाठीमागुन पीकअपने धडक दिली व ४०० फुट ओढत घेउन गेल्याने आई रुक्मीणी संतोष बोडखे या जागीच ठार झाल्या. तर मुलगा प्रवीण संतोष बोडखे (वय २१) हा गंभीर जखमी झाला त्याला पुढील उपचारासाठी हलविले आहे. आई व मुलगा आष्टीवरून आपल्या गावी सराटेवडगांव येथे जात असताना कडा सह.साखर कारखाना येथे मागून पिकअपने जोराची धडक दिल्याने आई रुक्मिणी संतोष उर्फ दादा बोडखे (वय-३७) जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आष्टीवरून आपल्या गावी जात असलेल्या मुलगा प्रविण व आई रुक्मिणी हीस कडा सह.साखर कारखाना समोर मोटारसायकल एम.एच.१६ ए.जी. ९६३३ या मोटारसायकलला पिकअप क्र.एम.एच.१४ एच.जी.०३८४
याने जोराची धडक देऊन महिला पिकअपला अडकून जवळपास ४०० फूट फरपटत नेले असल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.तर मुलगा प्रविण हा खंबीर जखमी असून आष्टी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात उशीरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.पुढील तपास पो.काॕ.
अनिल सुंबरे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here