आमदार राम सातपुते यांची भाजयुमो राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड

राम सातपुते

 

नवी दिल्ली । प्रतिनिधी

in article

माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बुधवार दि. 14 जुलै रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी ही घोषणा केली. सातपुते यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेते आणि देशभरातून युवकांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

 

Preganancy Bible पुस्तकावरून करीना कपूर खान वादाच्या भोवऱ्यात;विरोधात तक्रार दाखल

 

राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहे. युवा, अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे. शेतकरी कुटुंबातून संघर्ष करत पुढे आलेले राम सातपुते यांनी विद्यार्थी दशेत सक्रियपणे अभाविपचे काम केलेले आहे. आमदार झाल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठवत त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. नुकत्याच झालेल्या अधिवेशनातही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत राम सातपुते यांनी आवाज उठवला होता. त्यांच्या या निवडीमुळे भाजयुमोला राष्ट्रीय पातळीवर अभ्यासू आणि युवा नेता मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

युवकांच्या संघटन बांधणीसोबतच पक्षवाढीसाठी काम करणार -सातपुते

भाजपा युवा मोर्चाने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. येणाऱ्या काळात युवकांच्या विविध प्रश्नांवर काम करणार आहे, सोबतच भाजपाच्या पक्षवाढीसाठी सक्रियपणे देशभरात युवकांचे संघटन उभा करण्यावर भर देणार आहे. कार्यकर्त्याला संधी देणारा पक्ष आहे, हे पुन्हा एकदा भाजपाने दाखवून दिले असल्याची भावना आमदार  सातपुते यांनी व्यक्त केली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here