नाशिक जिल्ह्यात भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

nashik accident नाशिक जिल्ह्यात भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

नाशिक

nashik accident नाशिक जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीच्या पंढरपूरवाडी नजीक  अपघाताची घटना घडली. भीषण अपघातात एकाच कुटूंबांतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात २ पुरुषांसह १ महिला आणि एका लहान मुलीचा मृत्यू झाला. भरधाव कारचे पुढील टायर फुटल्याने कार पलीकडील लेनवरून जाणाऱ्या क्रेनवर जावून आदळल्याने अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती, या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला.

कार खोल दरीत कोसळुन झालेल्या पती ठार,पत्नी जखमी

nashik accident today मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी जवळ भीषण अपघात होऊन ४ जण  जागेवरच ठार तर १ जण  गंभीर जखमी झाल्याची घटना घडली . सदर घटना सायंकाळच्या सुमारास पंढरपुरवाडी समोर नाशिकहुन मुंबईकडे जाणारी होंडा एसेंट कार एम. एच. 04 एफ. ए. 8291 ही गाडी भरगाव वेगाने जात असतांना गाडीचा पुढील टायर फुटल्याने ही कार उलटून थेट मुंबईहुन नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर कार घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर (क्रेन) वर जोरदार आदळल्याने भीषण अपघात झाला, या अपघातात एकाच कुटुंबातील लहान १ मुलगी १ महिला व २ पुरुष जागेवर ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली .या अपघातात रणजीत कुमार वर्मा वय ३४ खडकपाडा ठाणे,मनोरमा कौशिक वय २८,खुशी कौशिक वय ६,
चौथ्या मृतदेहाची ओळख पटली नाही, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ मदतकार्य केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles