अंगणवाडी ची आजची ताजी बातमी वाचली का ?

anganwadi latest news
anganwadi latest news

 

 

in article

 

 

anganwadi latest news:अंगणवाडी ची आजची ताजी बातमी वाचली का ? राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये त्यांनी अंगणवाडी पगार वाढ  केल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता अंगणवाडी कर्मचारी भरती होणार आहे.

आज सदर केलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील अंगणवाडी सेविका भरती रखडली होती. आज या अधिवेशनात त्यांनी राज्यातील 20000 अंगणवाडी सेविकांची भरती केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच  latest news of anganwadi workers salary मध्ये वाढ केली आहे.

यावेळी त्यांनी अभंग सादर केला ते म्हणाले कि,

लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची..

आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात वाढ केल्याचे जाहीर केले. यापूर्वी या आशा स्वयंसेविकांना ३५०० रुपये इतके मानधन मिळत होते. या मानधनाची रक्कम वाढविण्यात आली आहे. ही रक्कम आता ५ हजार इतकी करण्यात आल्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

 

अंगणवाडी ताजी बातमी 2023 अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ

राज्यातील अंगणवाडी सेविकांचे आणि मदतनीस यांचे मानधन वाढविण्यात आले आहे. यासाठी अंगणवाडी महिला कर्मचारी यांनी काही दिवसापूर्वी राज्यभर मोठे आंदोलन केले. त्याचा परिणाम म्हणून सरकारला ह्या मानधनात वाढ करावी लागली आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन हे यापूर्वी  8325 इतके होते. ते आता वाढवून 10,000 रुपये करण्यात आले आहे.

 

एवढेच नव्हे तर अंगणवाडी ताजी बातमी अशी आहे कि, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार असल्याचे जाहीर करण्यात आले.  राज्यात अनेक भागात  मिनी अंगणवाडी आहेत. या मिनी अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये वाढविण्यात आले आहे.

anganwadi latest news maharashtra : या अंगणवाडी मध्ये सेविकांबरोबर मदतनीस कार्यरत असतात. त्यांच्याही मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या  मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये करण्यात आले आहे.

 

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1633746934631665665?s=20

अंगणवाडी न्यूज

 

अंगणवाडी,आशा सेविका पगारवाढ होणार

– आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
– गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
– अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
– मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
– अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
– अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
– अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

 

 

 

 

 

 

 

1 COMMENT

  1. […] वर्गासाठी भरभरून घोषणा केल्या आहेत. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कससाठी तर फडणवीस सरकारने […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here