आष्टीत तीन लाखाची गांजाची झाडे जप्त

आष्टी

तालुक्यातील पिंपरी आष्टी शिवारात गांजाची शेती केल्याचे पोलिसांना आढळून आले असून आष्टी पोलीस उपाधीक्षक पथकाने या शेतात छापा टाकून तीन लाख किमतीची गांजाची झाडे जप्त केली आहे.

याबाबतची माहिती अशी की पिंपरी आष्टी शिवारातील गट क्रमांक 71 या ठिकाणी बेकायदेशीररित्या गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. सदर माहितीची खातरजमा करून पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांचेसह पोलीस पथक व पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला.

छापेमारी दरम्यान, इसम घनश्याम बाबुराव डांगरे, वय 53 वर्षे, रा. पिंपरी आष्टी यांच्या मालकीच्या शेतामध्ये गांजाची बेकायदेशीर लागवड आढळून आली.

शेतात एकूण 08 गांजाची ओली झाडे मिळून आली असून वजन 13.340 किलोची अशी पंचनामा करून जप्त करण्यात आली आहे. मुद्देमालाची एकूण बाजार मूल्य अंदाजे रु. 3,33,500/- इतकी आहे.

हि कारवाई मा. श्री. नवनीत काँवत साहेब पोलीस अधीक्षक बीड, मा. श्री. सचिन पांडकर साहेब अपर पोलीस अधीक्षक बीड , मा पो. उपधीक्षक श्री. बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय नरवाडे, सपोनि विक्रांत हिंगे, पोउपनि श्रीकृष्ण शिंदे, पो.ह. देविदास जमदाडे, सुनील अलगट, प्रवीण क्षीरसागर, संतोष दराडे, कृष्णा डोके, राम आगरकर, भरत कोळेकर, सचिन पवळ, संध्या लोंढे, राम भाग्यवंत यांच्या संयुक्त पथकाने केली.

सदर गुन्ह्यात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून, गांजाची लागवड करणाऱ्या व्यक्तीवर NDPS कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया चालू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles