स्व.संतोष देशमुख हत्येतील वाल्मीक कराड याच्या सहभागाबद्दल ॲड उज्वल निकम यांचा जोरदार युक्तिवाद

बीड

मस्साजोग येथील  सरपंच स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीड च्या मकोका कोर्टात सुनावणी झाली.या सुनावणी दरम्यान झालेल्या युक्तिवादानंतर सात जुलै पर्यंत मकोका न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीडच्या मकोका कोर्टात सुनावणी सुरू आहे.या सुनावणी दरम्यान या हत्येतील सहभागाबद्दल आरोपी वाल्मीक कराड यांचा या गुन्ह्यातील सहभागाबद्दल आपला सहभाग नसल्याचे सांगितले. त्यावर विशेष वकील ॲड उज्वल निकम यांनी जोरदार विरोध करत ,वाल्मीक कराड यांचा कसा सहभाग या गुन्ह्यात असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच सात जुलै पर्यंत निर्णय राखीव ठेवल्याची माहिती विशेष सरकारी वकील ऍड उज्वल निकम यांनी दिली आहे.
कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या सहकाऱ्यांच्या दुष्कृत करत असतो किंवा एक्टिंग करत असतो आज त्याप्रमाणे न्यायालयामध्ये प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने सात जुलैपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.
आता या प्रकरणाची सुनावणी सात जुलै रोजी होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles