अहिल्यानगर
Ahilyanagar crime news शहरातील सिताराम सारडा विद्यालयांमध्ये आठवीच्या विद्यार्थ्यांने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा खून केल्याची घटना दुपारच्या वेळी शाळा सुरू असताना घडली.
शेख मोहम्मद मुस्तकीन हा इयत्ता दहावी मधील विद्यार्थी मृत असून त्याला इयत्ता आठवी मधील विद्यार्थी जोएब वसीम शेख याने चाकूने वार केले.किरकोळ वादानंतर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुपारी जोएब हा चाकू घेऊन वर्गात आला होता. त्याने आल्यानंतर महमद याच्या शरीरावर चाकूने वार केले. मानेला आणि हृदयाच्या खाली वार झाल्याने महमद याचा जागीच मृत्यू झाला. ही दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत ही घटना घडली. आरोपी हा अल्पवयीन आहे.
सदरचे दोघेही सर्जेपुरा या भागात राहणारे आहे आणि जवळजवळ त्यांची घरात शंभर मीटर अंतरावर आहेत. त्यांच्या वडिलांचे कोणतेही वाद नाही तर मुला मुलांचेच वाद आहेत .क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वगैरे छोट्या छोट्या कारणांवरून मुलांची वाद आहे. त्यावर त्याने हा चाकू हल्ला केल्याचे पोलिस उपअधीक्षक भारती यांनी सांगितले.
त्यानंतर त्या मुलाला हॉस्पिटलला नेण्यात आला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे. ज्या मुलाने मारलं त्याच्याकडे पोलीस स्टेशन येथे चौकशी चालू आहे .

