Homeताज्या बातम्यातीन दिवसापासुन केज तालुक्यातील ही शाळा बंद

तीन दिवसापासुन केज तालुक्यातील ही शाळा बंद

केज

Kej school news शाळा 15 जूनला सुरू झाल्या मात्र बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील घाटेवाडी येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा अजूनही शिक्षकाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी बंद ठेवली आहे.

राज्यात सगळीकडे नवीन विद्यार्थ्याचे धुमधडाक्यात स्वागत केले जात असताना प्रशासनाला निवेदन देऊनही येथील विद्यार्थ्यांंना शाळेचे वर्ग पाहता आले नाहीत.

आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे ही सर्वच पालकांची ईच्छा असते त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेकडे वारंवार शिक्षक मिळावेत म्हणुन मागणी केली.

इयत्ता 1 ते 8 पर्यंतचे वर्ग या शाळेत असून त्यांना फक्त 4 शिक्षक शिकवतात. मंजूर पदे जास्त असूनही प्रशासनाने त्यांना शिक्षक न दिल्याने येथील ग्रामस्थांनी शाळा बंद करून मुलांचे दाखले देण्याची मागणी केली आहे.या शाळेत एकूण 135 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामस्थ मागील वर्षापासुन शिक्षक मागणी करत आहेत. मात्र जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी हा पावित्रा घेतला आहे. यासंदर्भात निवेदन देऊनही या शाळेकडे कोणीही शिक्षण विभागाचे अधिकारी फिरकले नाही.

एकीकडे विद्यार्थ्यांअभावी शाळा बंद होतायत,परंतु जिथे विद्यार्थी आहेत तिथे शिक्षक नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे.बीड जिल्ह्यात अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. घाटेवाडी सारख्या शाळेला शिक्षक देण्याऐवजी या शाळेच्या पदावरून अतिरिक्त शिक्षकाचे पगार केले जात आहे.पगार काढण्यासाठी शाळा मात्र शिकविण्यासाठी नाही अशीच स्थिती या शाळेची झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments