कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात वणवे लागण्याचे प्रमाण कमी

वणवे

 

अकोले, ता.30 डिसेंबर/प्रतिनिधी

in article

कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात कोरोणा, लॉक डाऊन,लोकांचा सहभाग यामुळे वणवे लागण्याचे प्रमाण कमी झाले व कृत्रिम वणव्याचा भडका उडाला नाही अशी माहिती सहायक वन संरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली.

कळसूबाई हरिश्चंद्र गडाचा परिसर नेहमीच निसर्ग प्रेमी व पर्यटक आकर्षित करतो.वर्षभर येथे पर्यटक येत असतात तर ट्रेकर्स यांचे हे आवडीचे ठिकाण वन्य जीवांचे हे माहेरघर देशाबरोबर राज्यात कोरोना चे संकट आले त्यामुळे गेली नऊ महिने या भागात पर्यटक फिरकले नाही .

हेही :नाशिक येथे आर्मी कॉम्बेक्ट एव्हीएशन च्या प्रशिक्षणार्थींना विग्ज प्रदान

त्यात निसर्गाचे जतन करणारे थोडे व आपला आनंद द्विगुणित करताना निसर्गाला हानी पोहचविणारे अधिक मात्र लॉक डाऊन मुळे ही मंडळी या भागात फिरकलेच नाही .वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळ,अमोल आडे या अधिकारी वर्गाने या परिसरातील गावागावात जाऊन वणवे लागल्यास वन विभागाला कळवा .त्यामुळे जंगलाची हानी होते ,वन्य जीव,कीटक,वनस्पती यांचे अतोनात नुकसान होते. तर कृत्रिम वणवे पसरविणे वन कायद्यात गुन्हा आहे. शिक्षेचे स्वरूप गंभीर आहे हे समजावून सांगितले .ठिकठिकाणी बोर्ड लावून प्रबोधन केले या बाबी पटवून दिल्या त्यामुळे लोकांचा मोठा सहभाग यात दिसून आला .गत वर्षी साडेतीन एकरवर वणवे लागले .त्यामुळे मोठे नुकसान झाले .वन विभागाने ज्या गावांना वनवे लागणार नाहीत. त्या गावांना पाच हजार रुपये बक्षीस ठेवले होते. त्यात घाटघर ,रतनवाडी, पंजारे, कुमशेत,लव्हळवाडी,साम्रद ,उडदावणे या गावांनी सहभाग नोंदवला. तर वनविभागाने फायर लाईन ओडून वणवा लागला तरी अधिक आग लागणार नाही याची दक्षता घेतली त्यामुळे यावर्षी वणवे लागलेच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here