नवीन वर्षाच्या दिवसापासून FASTag अनिवार्य अंमलबजावणी; 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत जुनी पद्धत राहणार कायम

FASTag

 

दिल्ली दि 31 डिसेंबर

in article

रस्ता परिवहन व महामार्ग मंत्रालयाने 1 जानेवारी, 2021 पासून 1 डिसेंबर, 2017 पूर्वी विकल्या गेलेल्या मोटार वाहनांच्या एम आणि एन प्रकारात FASTag सक्तीचे केले आहे.

हे FASTag एम आणि एन श्रेणी ,मध्ये लागू असणार आहे. ‘एम’ मोटार वाहन म्हणजे प्रवासी वाहून नेणारे चारचाकी वाहन. तर श्रेणी ‘एन’ म्हणजे वस्तू वाहून नेण्यासाठी कमीतकमी चार चाके वापरली जातात, ज्यात माल व्यतिरिक्त व्यक्ती देखील वाहून नेऊ शकतात.मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की केंद्रीय मोटर वाहन नियम जसा आहे तसा अस्तित्त्वात असणार आहे.

हेही वाचा :कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात वणवे लागण्याचे प्रमाण कमी

तथापि, राष्ट्रीय महामार्गांवरील टोल  प्लाझाच्या दोन्ही लेनमध्ये १५  फेब्रुवारी, २०२१  पर्यंत FASTag द्वारे तसेच रोख पद्धतीने फी भरणे स्वीकारले जाणार आहे. याशिवाय टोल  प्लाझाच्या फास्टॅग लेनमध्ये फक्त FASTag द्वारे फी भरणे सुरू राहील असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की 1 जानेवारी 2021 पासून फी प्लाझावर 100% ई-टोलिंगची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here