सिंदखेड राजा येथे माँ जिजाऊ यांचा जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा

जिजाऊ

 

बुलढाणा दि 12 डिसेंबर,प्रतिनिधी

in article

आज माँ जिजाऊ यांची जयंती . बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचा जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

सिंदखेडराजा येथे काही मान्यवरांच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव साज़रा करण्यात आला.महाराष्ट्र शासनाच्या वतीने सकाळी राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ राजेन्द्र शिंगणे यांच्या हस्ते माँजिजाऊ यांचे पुजन करण्यात आले.
यावेळी राजे लखुजी राजे यांचे 16 वे वंशज श्री शिवाजी राजे तसेच तेरावे वंशज विजयसिंह यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, सिंदखेड राजा चे नगराध्यक्ष सतीश तायडे, राजे लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव राज्यभरातील अनेक भक्त,मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकारी महिला भगिनी यावेळीउपस्थित होत्या. जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर यावेळी रोषणाई करण्यात आली. दीप उजळून जिजाऊंच्या लेकिनी जन्मोत्सवाचा सोहळा साजरा केला.

हेही वाचा:पिंपळगाव खांड जलाशयात कार बुडाली एकाचा मृत्यू दोघे वाचले

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here