चौघी नी केली साजरी वडिलांची ७५वी ….मुलगी वाचवा मुलगी शिकवा दिला संदेश
अकोले ,ता.१६
वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा म्हणणारे समाजात खूप मात्र मुलीचं माझ्या आधार म्हणणारे माजी प्राचार्य मुरलीधर बारेकर यांची नुकतीच ७५वी(अमृत महोत्सव ) त्यांच्या चौघी मुलींनी साजरी केली.
सत्य निकेतन संस्थेच्या सर्वोदय विधा मंदिर मध्ये प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले मुरलीधर उर्फ अण्णा बारेकर,वयाची ७५गाठली तरी नित्य नियमाने प्राणायाम,व्यायाम फिरणे व योग्य आहार त्यामुळे तंदुरुस्त त्यांच्या सहचारिणी सौ. पुष्पा बारेकर उर्फ नानी सोबत असल्याने अण्णा नानीचे जगणे इतरांना लाजवेल असेच त्यांना चौघी मुली सुनीता गाडेकर,संगीता मांडवेकर,सोनाली भालेकर,स्वाती भालेकर एका राशीच्या या चौघी पदवीधर आपल्या अण्णा नानीला जीवापाड जपतात त्यांचे जावई ज्ञानेश्वर,विठ्ठल,विवेक,संजय,
कोरोना मूळे एकमेकांचे रक्ताचे नाते देखील एकमेकांना भेटू शकत नव्हते. मात्र अण्णांचा वाढदिवस साजरा करायचा या हेतू ने गुजरात ,महाराष्ट्र,मधून या मुली आपल्या पती राज मुले यांना सोबत घेऊन आल्या. ७५ दिव्यांनी ओवाळून आपल्या अण्णा नानीचा वाढदिवस त्यांनी साजरा केला. मुलींनी आपल्या आईवडिलांच्या प्रेमाची महती सांगताना उपस्थितांना मात्र अश्रू आवरता आले नाही.या कार्यक्रमाने समाजाला मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश देण्यास एम . के . बारेकर , सौ . पुष्पाताई बारेकर विसरल्या नाही हे विशेष . उपस्थितांना वृक्ष वाटप करून झाडे जगवा झाडे वाचवा म्हणत केला कार्यक्रमाचा समारोप. हे सर्व नियोजन नंदकिशोर बेल्हेकर यांनी केले.

