Homeताज्या बातम्याराज्यपालांनी केली अजय भीमराव धोंडे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती

राज्यपालांनी केली अजय भीमराव धोंडे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती

 

Bamu Senate member राज्यपालांनी केली अजय भीमराव धोंडे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती

आष्टी

Bamu Senate member   बीड जिल्ह्यातील भाजयुमो जिल्हाध्यक्ष अजय भीमराव धोंडे यांची  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी  नियुक्ती केली आहे.

या संदर्भात राज्यपाल कार्यालयाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांना पत्राद्वारे कळवले आहे.

कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी 9 सदस्यांची नियुक्ती केली आहे. औरंगाबाद जिल्हा 4, बीड 2, जालना 2, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एका सदस्यांचा समावेश आहे.
यामध्ये अ‍ॅड.अरविंद नागनाथराव केंद्रे, अरविंद वाल्मिक नरोडे, केदार रहाणे व मनोज माधवराव शेवाळे (औरंगाबाद), अजय भीमराव धोंडे व डॉ.विवेक पालवणकर (बीड), चत्रभुज लक्ष्मणराव गोडबोले व रवींद्र गणेश ससमकर (जालना) तर देविदास प्रभाकर पाठक (उस्मानाबाद) यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments