२७८ रूग्णांना डिस्चार्ज तर २७१ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

४८४

२७८ रूग्णांना डिस्चार्ज तर २७१ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर: जिल्ह्यात आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार ३७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२८० इतकी झाली आहे.

in article

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०६ आणि अँटीजेन चाचणीत २१ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६२, अकोले ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण १४, नेवासा ०३, पारनेर १०, पाथर्डी ३०, राहाता ०१, शेवगाव १३, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९, अकोले ०८, कोपर गाव ०५, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०६, पारनेर ०२, पाथर्डी ०१, राहाता ०७, राहुरी ०३, संगमनेर २८, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०७, कॅन्टोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २१ जण बाधित आढळुन आले. मनपा ०६, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०१, राहाता ०७, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आणखी वाचा:आष्टीत 9 बीड मध्ये 22 जिल्ह्यात एकूण कोरोना 57 बाधित

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ७६, अकोले ०८, जामखेड १८, कर्जत ११, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण १४, नेवासा ०५, पारनेर २३, पाथर्डी ०५, राहाता ३१, राहुरी ०३, संगमनेर ५३, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर १४, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:७४३७८*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १२८०*

*मृत्यू:११४९*

*एकूण रूग्ण संख्या:७६८०७*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here