मोतीलाल कोठारी विद्यालयात बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम संपन्न

कडा


येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात बालविवाह प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

बीड जिल्ह्यामध्ये होणारे बालविवाह बंद व्हावेत यासाठी युनिसेफ आणि बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळांमध्ये बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात
बालविवाह प्रतिबंध जनजागृतीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांचे खेळ घेण्यात आले. मुला मुलींना एकत्र बसून त्यांच्यामध्ये बालकांचे हक्क कर्तव्य तसेच वयात आलेल्या मुलांना समजून घेण्यासाठी पालकांची भूमिका काय असावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अंबाजोगाई येथील मनस्विनी विकास सेवाभावी संस्थेच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या स्वयंसेवकांनी गाणे खेळ आणि गप्पा यांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांना समजावून सांगितले.


या कार्यशाळेत विद्यालयाचे मुख्याध्यापक एम ई शिकारे , उपमुख्याध्यापक पी बी सरडे , स्वयंसेविका श्रीमती केदारी, श्रीमती गायकवाड यांच्यासह पालक आणि शिक्षक सहभागी झाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles