HomeमनोरंजनPreganancy Bible पुस्तकावरून करीनाकपूर खान वादाच्या भोवऱ्यात

Preganancy Bible पुस्तकावरून करीनाकपूर खान वादाच्या भोवऱ्यात

Preganancy Bible पुस्तकावरून करीना कपूर खान वादाच्या भोवऱ्यात;विरोधात तक्रार दाखल

बीड । प्रतिनिधी

करीना कपूर खान हिने लिहलेल्या करीना कपूर खान’s Preganancy Bible या पुस्तकाच्या टायटल वर बीड येथील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने आक्षेप घेतला असून तिच्या विरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

करीना कपूर खान’s Preganancy Bible

हे पुस्तक करीना कपूर अदिती शाह भीमजानी,यांनी लिहले असून प्रकाशक जरनॉट बुक्स यांनी प्रकाशित केले आहे.
या पुस्तकाच्या शिर्षकावरून ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याची तक्रार करण्यात आली असून करीना कपूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केली आहे.
करीना कपूर खान हिने आपल्या या पुसकाच्या रूपाने आपल्या Preganancy काळातील अनुभव सांगितले आहेत.या पुस्तकाच्या निर्मितीसाठी ऋतुजा दिवेकर, यांच्यासह अनेक लोकांचे सहकार्य मिळायचे तिने सांगितले आहे.आपल्या Preganancy काळातील अनुभवाच्या या पुस्तकाच्या शिर्षकाच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत असे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी सांगितले. आम्ही यासंदर्भात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून फिर्याद दाखल होईल असे शिंदे यांनी सांगितले.

 

 

bio disel,बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments