Homeताज्या बातम्याजिल्ह्यात 188, आष्टीचा आकडा वाढला,साबलखेड हॉटस्पॉट

जिल्ह्यात 188, आष्टीचा आकडा वाढला,साबलखेड हॉटस्पॉट

जिल्ह्यात 188, आष्टीचा आकडा वाढला,साबलखेड हॉटस्पॉट

बीड । प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील कोरोना बधितांचा आलेख वाढत.आज आष्टी तालुक्यात तब्बल 81 रुग्ण आढळून आले त्यामध्ये साबलखेड येथील संख्या 24 आहे.
बीड जिल्ह्यात एकूण 188 रुग्ण आढळून आले आहेत.
दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आष्टी तालुक्यात दौरा केला होता.जिल्ह्यात सर्वाधिक संख्या आष्टी तालुक्यात दिसून येत आहे.मात्र आज बीड तालुक्यात ही संख्या वाढली आहे.ही संख्या 30 झाली आहे.
बीड जिल्हा परिषदेने जिल्ह्यात 8 ते 12 वर्गाची शाळा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली मात्र वाढती कोरोना रुग्णांची संख्या प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे.
आष्टी तालुक्यात विविध गावात संख्या वाढताना दिसत आहे.चिंचाळा,बीडसांगवी,
शिराळ कारखेल, कडा या भागात रुग्ण आढळून येत आहेत.त्यामुळे एकूणच कोरोना अजूनही ग्रामीण भागात सुप्त अवस्थेत आढळून येत आहे.कोरोना टेस्ट कमी झाल्याने,मास्क फ्री जीवन नागरिक जगत असल्याने कोरोना स्प्रेडर्स ठरत आहेत.

आष्टी 81 अंबाजोगाई 06 बीड 30 धारूर 06 गेवराई 21,केज 15 माजलगाव 02 पाटोदा 17 शिरूर 5 वडवणी 05

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments