जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार
बीड दि 24 मार्च ,प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 26 मार्च ते एप्रिल या कालावधीमध्ये कडक टाळेबंदी घोषित केली. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद मधील सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता जिल्ह्यामध्ये कोरोनाला अटकाव करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यात दहा दिवस सक्त टाळेबंदी करण्यात येणार असल्याचे घोषित केले.यानंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्या दिनांक 25 आणि 26 या दोन दिवशी जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालये, कोविड केअर सेंटर ,उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षक संवर्ग, ग्रामसेवक,अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आरोग्य संवर्गातील कर्मचारी यांचा समावेश आहे.बरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आणखी वाचा:कसे असणार बीड जिल्ह्यात लॉकडाउन?
[…] […]
Affan