आष्टी दि 26 फेब्रुवारी, प्रतिनिधी
आष्टी तहसील कार्यालयात गुरुवारी प्रशासन व व्यापारी यांची कोरोनाबाबत एक आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीत दोन दिवस व्यापारी अँटीजेन चाचण्या होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.त्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली मात्र व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्यामुळे कॅम्प गुंडाळावा लागला.
कोरोनाबाबत नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी व्यापारी अँटीजेन चाचण्या करण्यात येणार असल्याचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी जाहीर केले होते.त्यानुसार आरोग्य विभागाने कन्या प्रशाला शाळा खडकत रोड आष्टी आणि जिल्हा परिषद शाळा मुलांची आष्टी येथे चाचण्या घेण्यासाठी 20 कर्मचारी यांची नियुक्ती केली.चाचण्यासाठी कक्ष उभारण्यात आला.मात्र या कडे आष्टी शहरातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. परिणामी आरोग्य विभागाला हा कॅम्प गुंडाळावा लागला.
शहरातील व्यापाऱ्यांनी व त्यांच्याकडील असलेल्या कामगारांनी ॲन्टीजन टेस्ट करणे बंधनकारक असतानाही व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात कोरोना बधितांचे वाढते प्रमाण पाहता चाचण्यांची संख्या वाढविण्यावर सरकार भर देत असून दुसरीकडे व्यापारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन मोरे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :राज्यात शाळाबाह्य मुलांचे मार्च मध्ये सर्वेक्षण
[…] […]