वारोळा येथे वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा | दोन महिलांची सुटका

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील वारोळा गावात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि माजलगाव ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त पथकाने केली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 20 मार्च 2026 रोजी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वारोळा येथे बाहेरील जिल्ह्यांतील महिलांना बोलावून वेश्याव्यवसाय चालवला जात आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ छापा टाकण्याचे आदेश दिले.

पोलीस पथकाने सापळा रचत डमी ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केली. संबंधित एजंट महिलेकडून 500 रुपयांची मागणी करण्यात आली. डमी ग्राहकाने रक्कम दिल्यानंतर ठरलेल्या इशाऱ्यावर पोलिसांनी छापा टाकला.

कारवाईदरम्यान अलका हडागाळे (रा. वारोळा) हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून 500 रुपयांची नोट जप्त करण्यात आली. याच ठिकाणी दोन पीडित महिला आढळून आल्या, ज्यांची सुटका करण्यात आली.

चौकशीत उघड झाले की, या महिलांना परभणी आणि छत्रपती संभाजीनगर येथून बोलावण्यात आले होते. प्रत्येक ग्राहकाकडून 500 रुपये घेतले जात होते, त्यापैकी महिलांना 300 रुपये दिले जात होते. उर्वरित रक्कम आरोपी स्वतःकडे ठेवत होते.

या प्रकरणात अलका हडागाळे आणि रामा गायकवाड यांच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5, 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी घटनास्थळी झडती घेतली असता 12 न वापरलेले निरोधही जप्त केले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles