T20 WORLD CUP 2021,टी20,सराव सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय.

T20 WORLD CUP 2021,

 

गौरव डेंगळे (१९/१०)

in article

दुबई.
T20 WORLD CUP 2021,टी20 विश्वचषक २०२१ मध्ये टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे.

संघाने आपल्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केला.सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५ गडी बाद १८७ धावा केल्या.

प्रत्युत्तरात टीम इंडियाने १९ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले.इशान किशनने ७० धावा केल्यावर दुखापत निवृत्त झाला.

याशिवाय केएल राहुलनेही ५१ धावा केल्या. २० ऑक्टोबर रोजी दुसऱ्या सराव सामन्यात संघ ऑस्ट्रेलियाशी सामना करेल. तत्पूर्वी सराव सामन्यात पाकिस्तानने चॅम्पियन वेस्ट इंडिजचा ७ गडी राखून पराभव केला.

१८९ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला ईशान किशन व केएल राहुल यांनी शानदार सुरुवात केली.

दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८.२ षटकांत ८२ धावा जोडल्या. केएल राहुलने २४ चेंडूत ५१ धावा केल्या मार्क वुडने त्याला बाद केले.

आणखी वाचा :hiware bazar,तंटामुक्त गावच नाही तर तंटामुक्त समाज निर्माण करण्याची गरज – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

त्याने ६ चौकार व ३ षटकार मारले.यानंतर कर्णधार विराट कोहली (११) मोठी खेळी खेळू शकला नाही.तो लिव्हिंगस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

T20 WORLD CUP 2021,सूर्यकुमार यादव अपयशी

इशान किशनने ४६ चेंडूत ७० धावा केल्याने दुखापत निवृत्त झाला. त्याने ७ चौकार व ३ षटकार मारले.

सूर्यकुमार यादवही मोठी खेळी खेळू शकला नाही. ९ चेंडूत ८ धावा केल्यावर त्याला विलीने बाद केले.

ऋषभ पंत २९ व हार्दिक पंड्या १६ धावांवर नाबाद राहिले.टीम इंडियाला शेवटच्या २ षटकांत विजयासाठी २० धावा करायच्या होत्या. ख्रिस जॉर्डनने १९ व्या षटकात २३ धावा दिल्या.

टी20 भारतीय गोलंदाज अपयशी

तत्पूर्वी,भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने ४९ धावा केल्या.

याशिवाय मोईन अलीने नाबाद ४३ धावा केल्या. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार एकही विकेट घेऊ शकला नाही.त्याने ४ षटकांत ५४ धावा दिल्या.

त्याचबरोबर लेगस्पिनर राहुल चाहरने ४ षटकांत ४३ धावा देऊन १ गडी बाद केला.वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

बुमराहने ४ षटकांत केवळ २६ धावा दिल्या व १ गडी बाद केला. आर अश्विनने ४ षटकांत २३ धावा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here