covid19ind org,भारतानं ९९ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला

covid19ind org,

 

mumbai

in article

covid19ind org,कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात भारतानं ९९ कोटी लस मात्रांचा ओलांडलेला टप्पा हे मोठं यश आहे. या संपूर्ण मोहीमेत संशोधक, आरोग्य कर्मचारी या सगळ्यांनी संघ भावनेनं काम केल्यानंच हा टप्पा गाठता आला असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलं आहे.

रोटरी इंटरनॅशनल या संस्थेनं, देश कोविड प्रतिबंधक लसीकरणात १०० कोटी मात्रापर्यंत पोचल्याबद्दल मुंबईत सन्मान सोहळा आयोजित केला होता.

या कार्यक्रमादरम्यान त्या  बोलत होत्या. पूर्वी भारतात एखादी लस यायला काही वर्षे जात, मात्र कोविड१९ लसीकरण मोहीमेत भारत अवघ्या ९ महिन्यांतच १०० कोटीच्या उंबरठ्यावर पोचला. या काळात लसींच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर झाला. लस निर्माता भारत संपूर्ण जगाला दिसला असं त्या म्हणाल्या.

covid19ind org,भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज 99 कोटी मात्रांचा महत्त्वपूर्ण (99,08,97,514) टप्पा ओलांडला.

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत देशभरात लसीच्या 37 लाखांपेक्षा अधिक (37,92,737) मात्रा देण्यात आल्या. लसीकरणाच्या अंतिम अहवालाचे काम रात्री उशिरा पूर्ण झाल्यानंतर आज दिवसभरात देण्यात आलेल्या मात्रांच्या एकूण संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

 

covid19ind org,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहीमेदरम्यान प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा, आर्थिक सहकार्य आणि प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच हे यश गाठणं शक्य झालं असल्याचं त्या म्हणाल्या.
कोविड प्रतिबंधक लसीकरणात महाराष्ट्रानं नऊ कोटीचा टप्पा ओलांडून चांगली कामगिरी बजावली. केंद्र सरकारनंही लस पुरवठ्यासह प्रत्येक टप्प्यावर राज्याला मदत केली असं त्या म्हणाल्या.

लहान मुलांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी कोणत्याही लसीला अद्याप मान्यता दिलेली नाही. ती देण्यापूर्वी वैयकीय बाबींसह संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं.

तीसरी लाट यायची शक्यता व्यक्त होत असली तरी दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. तीसऱ्या लाटेच्या शक्यता गृहीतधरून केंद्र सरकार सज्ज आहे. यादृष्टीनं राज्यांना पूर्वतयारीसाठी २३ हजार कोटींची मदत केंद्र शासन करत आहे अशी माहिती त्यांनी दिली.

 

आणखी वाचा :T20 WORLD CUP 2021,टी20,सराव सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय.

महाराष्ट्र सरकार लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची मूभा देण्याचा विचार करत आहे, याबाबत त्यांनी संभाव्य धोक्यांबाबत तज्ञांशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा, असं त्या यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here