Swachh Bharat Mission,निरंतर स्वच्छता ठेवणे काळाची गरज

- Advertisement -
- Advertisement -

कडा,

Swachh Bharat Mission,चांगल्या व सुदृढ आरोग्यासाठी आपल्या परिसरासोबत गावाची स्वच्छता ठेवणे आता अत्यंत गरजेचे असून भारत सरकार गेल्या सात वर्षापासून देशभरात स्वच्छतेचे वातावरण निर्माण करुन सर्वांना आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी वेगवेगळया योजना राबवत आहे. असे प्रतिपादन मा.आमदार भीमसेनजी धोंडे यांनी केले.

 

Swachh Bharat Mission,अंतर्गत कडा गावात ग्रामपंचायतच्या सहकार्याने स्वच्छता

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो अहमदनगर आणि आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालय कडा यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित‍, तीन ‍दिवशीय स्वच्छ भारत मिशन-२.० कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित‍ कार्यक्रमात धोंडे बोलत होते.

Swachh Bharat Mission
या प्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एच.जी.विधाते, उपप्राचार्य डॉ. बी.एम.चव्हाण, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहाय्यक प्रचार अधिकारी पी. कुमार, सामाजिक कार्यकर्ते आनिल ढोबळे,‍ वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, प्रा. सुभाष गांगर्डे, प्रा. सज्ज्न गायकवाड, प्रा. महेमूद पटेल,‍ आदी मान्यवर उपस्थित होते.

Swachh Bharat Mission

प्राचार्य, डॉ. विधाते यांनी Swachh Bharat Mission,कार्यक्रमाची रुपरेषा विशद करुन तरुणांना स्वच्छतेचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले. प्रा.डॉ. गायकवाड यांनी स्वच्छता राबविण्यासाठी युवक मोलाचा वाटा उचलू शकतात असे सांगितले. क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये ‍ यांनी स्वच्छ भारत मिशन-२.० मोहिमेची ‍विस्तृत माहिती देऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.‍
दरम्यान महाविदयालयात स्वच्छता दौड, रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा :हिवरेबाजार येथील शाळेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची 5 लक्ष रुपयांची मदत जाहीर

या तीनही स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक , विद्यार्थी आणि पदाधिकारी सहभागी झोले, स्वच्छता दौड स्पर्धेत सुमारे 200 विद्यार्थी आणि प्राध्यापक ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदविला. रांगोळी स्पर्धेत विद्यार्थीनींनी स्वच्छता आणि आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमिंत रांगोळी रेखाटली या विविध स्पर्धेतील ‍विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक देऊन या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Swachh Bharat Mission
महाविद्यालयाच्या ‍ पारिसरात आणी गावांत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या अभियानानिमित्त मोहिमेचा प्रचार करण्यासाठी तीन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles