Sugar cane,ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देण्यासाठी आता राज्य स्तरावर वेब व मोबाईल अँप

Sugar cane,

 

 

in article

 

 

मुंबई,प्रतिनिधी

Sugar cane, सामाजिक न्याय विभागामार्फत ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविण्यासाठी ऊसतोड कामागारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला होता.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांची Sugar cane, अद्ययावत पद्धतीने डिजिटल नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे यासाठी आता वेब व मोबाईल अँप तयार करून त्याव्दारे ही नोंदणी करण्यात येणार आहे.

 

याबाबतचा शासन निर्णय ना. मुंडे यांच्या निर्देशानुसार आज निर्गमित करण्यात आला असून सदर वेब पोर्टल व मोबाईल अँप तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ (महाआयटी) कडे सोपवण्यात आले असल्याचेही सदर शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

महाआयटी मार्फत कमीत कमी वेळेत हे वेब पोर्टल व मोबाईल अँप तयार करून कार्यान्वित करण्यात यावे व सध्या ऑफलाईन पद्धतीने सुरू असलेली राज्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी ऑनलाईन करून तातडीने पूर्ण करण्यात यावी, यासाठी महाआयटीला आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

Sugar cane, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार शासन निर्णय जारी

 

मागील अनेक वर्षांपासून Sugar cane,ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे काम केवळ कागद व घोषणापूरते मर्यादित राहीले होते. मात्र सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले आहे. प्रथमच राज्यात ऊसतोड कामगारांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे ऊसतोड Sugar cane, कामगारांच्या मुलांसाठी निवासी वसतिगृह उभारणी, इमारत अधिग्रहण आदी प्रक्रिया देखील सुरू आहे.

 

bio disel,बायोडिझेलची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बीड जिल्ह्यात  Sugar cane, ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी एका मोबाईल अँपचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात आला होता. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी ही संकल्पना संपूर्ण राज्यात राबविण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार आता राज्यभरातील ऊसतोड कामगारांच्या डिजिटल नोंदणीसाठी वेब पोर्टल व मोबाईल अँप सुरू करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here