सोलापूर
solapur accident pune solapur highway दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सापटणे गावाच्या हद्दीत एच पी पेट्रोल पंपाजवळ मोहोळ येथून टेंभूर्णी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा स्कार्पियो कार क्रमांक MH 42 BN 5112 ने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रक कंटेनर क्रमांक TS 08 UB 4478 ला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात स्कॉर्पिओमधील तीन तरुण डोक्याला, छातीला, हाताला, पायाला जबर मार लागून गंभीर जखमी झाले.
हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पुढील भाग हा कंटेनर खालीच अडकला असल्याने पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी किरण आवताडे (PSI) आणि कर्मचारी पो हे सचिन आतकर , पो ना सुनील माने, पो हे कॉ हनुमंत चौधरी, पो हे कॉ पांडुरंग जगताप तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अपघातग्रस्त स्कॉर्पिओ कार मधील जखमींना बाहेर काढून तात्काळ पुढील उपचारासाठी टेंभुर्णी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून या अपघातामध्ये कर्ण महेश पवार वय २३ वर्षे रा मोहोळ या गंभीर जखमीं झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीची नावे खालील प्रमाणे अनिकेत लक्ष्मण धोत्रे वय २३ वर्षे, रोहित विजय मोरे वय २१ वर्षे, कर्ण महेश पवार वय २३ वर्षे सर्वजण रा. मोहोळ येथील रहिवासी आहे.
