श्रीरामपूर गोळीबार प्रकरणात आणखी एक आरोपी अटक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई

अहिल्यानगर :

shrirampur golibar prakaran accused arrest ahilyanagar crime branch श्रीरामपूर शहरातील गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या आणखी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरने ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर अण्णासाहेब गांगुर्डे (वय 19, रा. मोरगेवस्ती, वार्ड नं. 7, श्रीरामपूर) याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 2 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील म्हसोबा चौक, पूर्णवादनगर, वार्ड क्रमांक 7 येथे फिर्यादी आणि त्याचा मित्र शुभम यादव हे बोलत असताना जुन्या वादाच्या कारणातून आरोपी अभय उर्फ अभी सुरेश ससाणे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला.

आरोपींनी लाकडी दांडके व इतर शस्त्रांच्या सहाय्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अभय सुरेश ससाणे याने त्याच्याकडील बंदुकीतून शुभम यादव याच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात शुभम यादव गंभीर जखमी झाला होता. आरोपींनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या घटनेप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 671/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 109(1), 189(2), 189(4), 190, 191(2), 191(3) तसेच आर्म्स अॅक्ट कलम 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने अभय उर्फ अभी सुरेश ससाणे (वय 21, रा. अजतवाडी, वार्ड नं. 7, श्रीरामपूर), अक्षय किरण कपोते (वय 25, रा. म्हाडा कॉलनी, श्रीरामपूर) आणि ओम राहुल कर्पे (वय 19, रा. धन्यगल्ली, श्रीरामपूर) या आरोपींना अटक केली होती.

गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला पकडले

गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

या पथकात सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये तसेच पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, भगवान थोरात, रमीजराजा अतार, प्रशांत राठोड आणि चालक चंद्रकांत कुसळकर यांचा समावेश होता.

पोलिसांनी तांत्रिक माहिती व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यावेळी दि. 11 जुलै 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत ज्ञानेश्वर गांगुर्डे हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याच्या घरी जाऊन शोध घेतला असता तो आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारांसह गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुढील तपास सुरू

ताब्यात घेतलेल्या आरोपीला श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी हजर करण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles