घोडेगाव जाळपोळ प्रकरणात 3 महिन्यांपासून फरार दोन आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहिल्यानगर :

ahilyanagar newasa sonai crime news नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे जाळपोळ करून दहशत निर्माण करणाऱ्या प्रकरणातील तीन महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या पथकाने जेरबंद केले आहे. राकेश विशाल आल्हाट आणि मयुर उर्फ बालु रविंद्र तेलधुने या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

पेट्रोल टाकून केली होती जाळपोळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 15 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 1 वाजून 24 मिनिटांच्या सुमारास घोडेगाव, ता. नेवासा येथे ही घटना घडली होती.

आरोपी शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख, बबलु जयसिंग लोंढे, राकेश विशाल आल्हाट, करण उर्फ बुट्या भांडालकर, विक्रम उर्फ बाबा सुधाकर आंग्रे आणि बालु तेलधुने (सर्व रा. घोडेगाव, ता. नेवासा) यांनी झापवाडी रोडने येत फिर्यादीच्या घरासमोर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पेट्रोल पदार्थ टाकून आग लावली होती.

या घटनेत फिर्यादीच्या मोटारसायकलसह जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले होते. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी फिर्यादी सचिन साहेबा फुलमाळी (रा. घोडेगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांच्या तक्रारीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 137/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 324(5), 324(6) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 111 वाढविण्यात आले आहे.

या प्रकरणातील आरोपी बबलु जयसिंग लोंढे आणि विक्रम उर्फ बाबा सुधाकर आंग्रे या दोघांना यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती.

गुप्त माहितीच्या आधारे फरार आरोपींना पकडले

गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे तसेच पोलीस अंमलदार फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, मनोज साखरे, प्रशांत राठोड आणि चालक भगवान धुळे यांचा समावेश होता.

पोलिसांनी आरोपींची माहिती गोळा करून शोध सुरू केला असता दि. 11 जुलै 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत फरार आरोपी घोडेगाव येथील मिरी रोड चर्च परिसरात असल्याची माहिती मिळाली.

माहितीची खात्री करून पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता दोन संशयित इसम फिरताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.

आरोपींनी गुन्ह्यात सहभागाची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा

ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे:

  1. राकेश विशाल आल्हाट (वय 23 वर्षे), रा. घोडेश्वरी मंदिराजवळ, घोडेगाव, ता. नेवासा
  2. मयुर उर्फ बालु रविंद्र तेलधुने (वय 21 वर्षे), रा. घोडेगाव

अशी सांगितली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी साथीदारांसह सदर गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे.

पुढील तपास सुरू

ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सोनई पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles