School girl Molestation भर रस्त्यात शाळकरी मुलींची छेडछाड ।  तिसगाव बंद 

School girl Molestation भर रस्त्यात शाळकरी मुलींची छेडछाड ।  तिसगाव बंद

तिसगाव

in article

School girl Molestation शाळेतून् घरी जाणाऱ्या शाळकरी अल्पवयीन मुलीची भर रस्त्यात छेड काढण्याचा प्रकार तिसगाव येथे घडला. या संदर्भात आज हिंदुत्ववादी संघटनांनी आणि तिसगाव ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत या घटनेचा निषेध केला आहे.

जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील बस स्थानकावरशाळा सुटल्यानंतर पावसामुळेनिवारा घेतलेल्यादोन शाळकरी मुलींची छेड काढण्याचा  प्रकार असून. या संदर्भात काही नागरिकांनी या छेडछाडीचा व्हिडिओ तयार केला या व्हिडिओ मध्ये हा आरोपी दोन मुलींची छेड काढताना दिसतोय तर दुसरी मुलगी ओरडत पळून जाताना दिसते.तिसगाव सारख्या वर्दळ असलेल्या गावाच्या बस स्थानकावर हा दिवसाढवळ्या प्रकार झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.दरम्यान या आरोपीने यापूर्वीही गावांमध्ये दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला होता.

तिसगाव tisgaon मध्ये मोठ्या प्रमाणावर शाळा शिकण्यासाठी मुली येत असतातया मुलींचे छेडछाड होण्याचे प्रमाण अनेक वर्षांपासून सुरू आहे.वृद्धेश्वर हायस्कूल चौकात तसेच बसस्थानकावर बाहेर गावावरून येणाऱ्या शाळकरी मुलींवर नजर ठेवून त्यांचे छेडछाड करण्याचे प्रकार वाढत आहे.

दिवसाढवळ्या झाल हा प्रकार झाल्याने तिसगाव मधील आणि परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
नागरिकांच्या या संतप्त भावनेतून हिंदुत्ववादी संघटना आणि तिसगाव ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत या घटनेचा निषेध केला आहे.

आरोपी हा बस स्थानकावरील रहिवासी आहे.
रफिक उर्फ लाल्या मुनीर पठाण  हे त्याचे नाव असून त्याने यापूर्वीही असे प्रकार केल्याची समजते.मात्र गावातील स्थानिक पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने हे प्रकार दाबण्यात आले आहेत.
या घटनेची थेट दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून या संदर्भात अहमदनगर पोलिसांनाअहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपीस पाथर्डी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here