कडा,प्रतिनिधी
school corona,आष्टी तालुक्यातील हिवरा येथील जिल्हा परिषद शाळेत केलेल्या अँटीजन चाचण्या मध्ये आणखी एक विद्यार्थीनी बाधित झाल्याचे आढळून आले.तिचे वडीलही बाधित आढळून आले.
हिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 18 ऑक्टोबर च्या अहवालात एक विद्यार्थी बाधित आढळून आला होता.
त्यानंतर आज या शाळेतील विद्यार्थ्यांची अँटीजन चाचण्या करण्यात आल्या .एकूण 44 विद्यार्थ्यांच्या चाचण्या केल्यानंतर एक विद्यार्थिनी कोरोना बाधित आढळून आली .तिच्या कुटुंबियांच्या चाचण्या केल्या असता तिचे वडीलही बाधित आढळून आले असल्याची माहिती सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितिन राऊत यांनी सांगितले.
school corona,मुलांमध्ये कोरोना वाढतोय
शाळेत गैरहजर विद्यार्थ्यांची आणखी एकदा चाचणी केली जाणार आहे.आणखी काही दिवसानंतर पुन्हा चाचणी कराव्या लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.काही दिवस विद्यार्थ्यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्याचे सांगितलं आहे.
त्यामुळे शाळा काही दिवस बंद ठेवण्यात आली.या गावातील घरांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी शाळेत येताना मास्क लावून आणि स्वतःचे सॅनिटायझर वापरावे आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
बातमी देताना व्यवस्थित बोध न होणारी वाटते.