उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रूईछत्तीसी येथे नागरी सत्कार

sakalai irrigation scheme
sakalai irrigation scheme

 

अहमदनगर

in article

sakalai irrigation scheme रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी दुपारी 1 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुप्रतीक्षित अशा साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता दिली तसेच सर्वेक्षणास दोन कोटी रूपयाचा निधी देखील मंजूर केल्या बद्दल, त्यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे.

या बरोबरच शेतकऱ्यांचा आत्मा असलेल्या अहमदनगर डिसीसी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

हे दोन्ही ही नागरी सत्कार समारंभ नगर तालुक्यातील रूईछत्तीसी या ठिकाणी संपन्न होणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील,आमदार बबनराव पाचपुते,मोनिका राजळे, राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या नागरी सत्कार समारोहास जेष्ठ नेते,भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

sakalai upsa irrigation scheme काय आहे?

15 ऑक्टोबर पर्यत या सर्व्हेक्षण निविदा sakalai water scheme अंतिम होणार असून.डिसेंबरअखेर सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येऊन आराखडा सादर करण्याचा सूचना या बैठकीत जलसंपदा खात्याला देण्यात आल्या आहेत.

डिसेंबर 2022 नंतर चौथ्या सुधारित प्रशासकीय आराखड्यात साकळाई योजनेचा समावेश करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पुढील अर्थ संकल्पात त्यासाठी निधी मंजूर केला जाणार आहे.याबरोबरच डिंभे धरण ते माणिकडोहो main source of water, अंतर्गत बोगद्यास मान्यता देण्यात आली आहे.

तसेच कुकडी डावा कालव्याच्या प्रस्तावित मूळ क्षमतेने वाहता करण्यासाठी विशेष दुरुस्ती निधीसही मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत होत येडगाव धरणातील पाणी साठा वाढून त्याचा फायदा मोठ्या क्षेत्राला मिळणार आहे.साकळाई मार्गी लागल्यामुळे नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here