Pune Ipl t20 ट्वेन्टी-२० सामन्याच्या तिकीट विक्रीस २७ डिसेंबरपासून सुरूवात

Pune Ipl t20
Pune Ipl t20

पुणे

 

in article

Pune Ipl t20  महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्याचे गुरूवार, दि. ५ जानेवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. २२ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर २०२३ या नवीन वर्षात क्रिडा रसिकांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची मेजवानी मिळणार आहे.

 

२०२३ या नवीन वर्षात भारतीय संघाच्या श्रीलंका संघाविरूध्दच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यामध्ये आयोजित होणार आहे. याआधी पुण्यामध्ये मार्च २०२१ मध्ये भारतीय संघाचे इंग्लंड संघाविरूध्द ३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

नवीन वर्षात भारतीय क्रिकेट संघाचा घरचा आंतरराष्ट्रीय मौसम ३ जानेवारी २०२३ पासून सुरू होत असून यामध्ये श्रीलंका संघाविरूध्द ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांचे आयोजन केले गेले आहे. सध्या भारतीय संघ बांग्लादेश विरूध्द कसोटी सामने खेळत असून २६ डिसेंबर २०२२ रोजी या दौर्‍याचा समारोप होणार आहे.

 

pune Ipl t20 cup 2023 भारतीय संघ ३ जानेवारी २०२३ रोजी श्रीलंका संघाविरूध्द पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळणार असून त्यानंतर ते पुण्यामध्ये दुसरा सामना खेळण्यास येणार आहेत. हा दिवस-रात्र सामना असणार आहे.

 

एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित होत असलेला हा चौथा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना ठरणार असून तेरावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना ठरणार आहे. एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आत्तापर्यंत २ आंतरराष्ट्रीय कसोटी, ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० तसेच ५१ इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) सामन्यांचे आयोजन केले गेले आहे.

 

एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम गहुंजे येथे याआधी झालेल्या तीन आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाला दोनदा विजय मिळाले होते. २०१२ मध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाचा पाच गडी राखून पराभव केला होता. २०१६ मध्ये झालेल्या दुसर्‍या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघाचा पाच गडी राखून पराभव केला होता. average score at pune ground in ipl t20

२०२० मध्ये झालेल्या तिसर्‍या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाचा ७८ धावांनी पराभव केला होता.

 

भारतीय संघ पुण्यामध्ये श्रीलंकेविरूद्धच्या १-१ (विजय-पराजय) या ट्वेन्टी-२० रेकॉर्डमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक असतील आणि या सामन्यात विजय मिळवल्यास मालिकेमध्येही आघाडी घेण्यास उत्सुक असतील, अशा विश्‍वास वाटतो.

 

क्रिकेटप्रेमी आणि रसिकांना नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच एका रोमांचकारी आणि उत्कंठावर्धक सामना अनुभवायला मिळेल, अशी आशा आहे.

 

भारत आणि श्रीलंका आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्याची तिकीटविक्री २७ डिसेंबरपासून  ipl t20 tickets booking 20 in pune

 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्याच्या अधिकृत तिकीट विक्रीला महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आजपासून (मंगळवार, २७ डिसेंबर २०२२) सकाळी १०: वाजता प्रारंभ करणार आहे.

 

ipl t20 tickets pune या ट्वेन्टी-२० सामन्याची तिकीटे क्रिकेटप्रेमी दोन पध्दतीने मिळवू शकणार आहेत. ुुु.लेेज्ञूीहेु.लेा या संकेतस्थळावर ही तिकीटे ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. तसेच सामन्याची प्रत्यक्ष (बॉक्स ऑफिस) तिकीटविक्री पीवायसी हिंदू जिमखाना, भांडारकर रोड आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे होणार आहे. या दोन्ही ठिकाणांवरील बॉक्स ऑफिस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत खुले असणार आहेत.

 

तिकीट विक्रीचे दर असेः ईस्ट स्टँड आणि वेस्ट स्टँडः रूपये ८००/-; साऊथ अप्परः रू.११००; साऊथ लोअरः रू. २०००/-; साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टँडः रू.१७५०/-; नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टँडः रू.१७५०/-; नॉर्थ स्टँडः रू. २०००/-; साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी स्टँडः रू. ३५००/-; कॉर्पोरेट बॉक्सचे (१२ व्यक्तींची आसनक्षमता) तिकीट रू. ६,००,०००/-.

 

 

Pune Ipl t20 एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजेः

महत्वाचे टप्पेः ipl t20 pune team list

२१ डिसेंबर २०११: महाराष्ट्र-हिमाचल प्रदेश यांच्यातील रणजी करंडक लढतीने औपचारीक उद्घाटन.

१ एप्रिल २०१२: एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन.

८ एप्रिल २०१२: आयपीएल-५ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि पुणे वॉरीयर्स यांच्यात सामना.

२० डिसेंबरः २०१२: पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामना – भारत वि. इंग्लंड.

१३ ऑक्टोबर २०१३: पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना – भारत वि. ऑस्ट्रेलिया.

९ नोव्हेंबर २०१५: बीसीसीआयकडून स्टेडियमला कसोटी दर्जा.

९ फेब्रुवारी २०१६: दुसरा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामना – भारत वि.श्रीलंका.

२४ फेब्रुवारी २०१६: पहिला रणजी करंडक अंतिम सामना.

१५ जानेवारी २०१७: दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना – भारत वि. इंग्लंड.

२३ फेब्रुवारी २०१७: पुण्यातील पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना – भारत वि. ऑस्ट्रेलिया.

२५ ऑक्टोबर २०१७: तिसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना – भारत वि. न्युझीलंड.

२७ ऑक्टोबर २०१८: चौथा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना – भारत वि. वेस्ट इंडिज.

१० ऑक्टोबर २०१९: दुसरा आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना – भारत वि. दक्षिण आफ्रिका.

१० जानेवारी २०२०: तिसरा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामना – भारत वि. श्रीलंका.

२३, २६, २८ मार्च २०२१: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका (३ सामने) – भारत वि. इंग्लंड.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here