पिक अप दुचाकीच्या धडकेत एक ठार दोन जखमी; पोखरी जवळ घडली घटना

पिक अप

 

आष्टी दि ९ , प्रतिनिधी

in article

पिक अप दुचाकीच्या धडकेत एक ठार तर दोन जखमी झाल्याची घटना जामखेड रस्त्यावर  पोखरी जवळ घडली. हि घटना रात्री उशिरा घडली.
आष्टी तालुक्यातील पांढरी येथील कानिफ भिमराव वांढरे वय ३८ वर्षे हे आपल्या पांढरी गावाकडून घरी जात असताना पोखरी गावाजवळ पिक अप आणि त्यांच्या दुचाकीच्या धडकेत ते जागीच  ठार झाले.  त्यांची पत्नी व मुलगी या गंभीर जखमी झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील पांढरी येथील कानिफ वांढरे यांचा कुकुटपालन व्यवसाय आहे. ते आपल्या दुचाकी क्रं. MH 23 AP 5180 वरुन आपल्या गावाकडून पोखरी येथील त्यांच्या कुकुट पालन व्यवसायकडे जात होते.

पोखरी गावाजवळ जामखेड कडून नगर मार्गे जात असलेल्या पिक अप क्रं. (MH 14 V 9019 )यांची धडका होऊन  कानिफ वांढरे हे ठार झाले. घटनास्थळी ग्रामस्थानी व नातेवाईकांनी धाव घेत पत्नी सोनाली वांढरे ( वय ३० ),मुलगी संस्कृती वांढरे वय ९ वर्षे यांना उपचारासाठी अहमदनगर येथील मॅक्स केअर हाॅस्पिटलमध्ये दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृत  वांढरे यांच्यावर पांढरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आले.या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनाजी हंबर्डे,पो का संजय गुजर हे करीत आहेत.

हेही वाचा :गुटखा बंदी संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here