सत्यजित तांबे ६८ हजार ९९९ मतांनी विजयी

- Advertisement -
- Advertisement -

नाशिक पदवीधर मतदारसंघ I सत्यजित तांबे ६८ हजार ९९९ मतांनी विजयी

nashik graduate constituency election result : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीची सर्वाधिक ६८ हजार ९९९ मत मिळवून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे satyajeet tambe election result 2023  विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विजयी उमेदवार सत्यजित तांबे यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पहिल्या पसंतीच्या १ लाख २९ हजार ६१५ मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्याची घोषणा करत उमेदवारांना प्राप्त मतांची माहिती दिली.

विजयी उमेदवारासाठी ५८ हजार ३१० मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. सत्यजित तांबे यांनी निश्चित कोट्यापेक्षा १० हजार ६८९ मते अधिक प्राप्त केली. त्यांना ६८ हजार ९९९ मत प्राप्‍त झाली आहेत. एकूण मतमोजणी नतंर १ लाख १६ हजार ६१८ मत वैध ठरली तर १२ हजार ९९७ मत अवैध ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.

मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी सत्यजित तांबे satyajeet tambe news  यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले. रात्री १२ वाजून १० मिनिटांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, जिल्हाधिकारी नाशिक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण् डी., जिल्हाधिकारी अहमदनगर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी धुळे तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles