नगर आष्टी अमळनेर रेल्वे लवकरच सुरु?

nagar ashti amalner railway
nagar ashti amalner railway

 

आष्टी

in article

nagar ashti amalner railway नगर आष्टी अमळनेर रेल्वे लवकरच सुरु होण्याचे चिन्ह आहेत. येत्या 31 डिसेंबर च्या आधी अमळनेर पर्यंतच्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्राकडून माहिती मिळाली आहे.

23 डिसेंबर 2023 ला आष्टी येथून न्यू आष्टी अहमदनगर रेल्वेची सुरुवात झाली होती. त्यानंतर आता अमळनेर पर्यंतचे काम पूर्ण झाल्याने नगर अमळनेर पर्यंत ही रेल्वे धावणार आहे.

दरम्यान नगर येथे रेल्वेला आग लागण्याने नगर न्यू आष्टी ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.या उद्घाटनानंतर ही रेल्वे सेवा सुरळीत होऊ शकेल अशा आशा आहेत. मागील वर्षी या उद्घाटनासाठी राज्यमंत्री रावसाहेब दानवे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या हस्ते झाले होते.

यावेळी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांचे हस्ते होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

nagar ashti railway latest news 

new ashti railway station  नारायणडोह-सोलापूरवाडी-लोणी-धानोरा-कडा व आष्टी रेल्वे  स्थानके पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आष्टी ते अमळनेर पर्यंत चे सर्व लहान मोठे पूल आणि रेल्वे रूळ यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हे उद्घाटन होणार असल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here