मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मारण्याची कोणी दिली सुपारी ?

जालना

धनंजय मुंडेंनी माझ्या विरोधात षड्यंत्र रचले, मला ठार मारण्याची सुपारी दिली, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय. जालन्याच्या अंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलत होते.

काल जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या दोघा संशयितांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या घात पाताच्या कटावर आज मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत.

दरम्यान, मराठा समाजाने शांत रहावे, असं आवाहन देखील जरांगे यांनी केलंय. माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

बीडचा कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात हे षड्यंत्र रचण्याचे काम केले असं जरांगे यांनी म्हटलय.

मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचे असल्याचं ही जरांगे म्हणालेत. अशा वृत्तीचा आपल्याला नाय नाट करावा लागेल, असं सांगत आरक्षण, राजकारण हा विषय वेगळा आहे. पण जीवावर उठणे हा विषय खूप गंभीर आहे, असं देखील जरांगे यांनी बोलताना स्पष्ट केलंय.

दरम्यान, मला मारण्यासाठी 3 पर्याय दिले होते. माझे खोटे रेकॉर्डिंग तयार करायचे होते पण ते भेटले नाही. दुसऱ्या मुद्दा माझा खूनच करुण टाकायचा आणि तिसरा मुद्दा माझा औषध गोळ्या देत घातपात करण्याचा होता, असं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles