नांदेडचा शिवराज राक्षे झाला महाराष्ट्र केसरी

धाराशिव

Maharashtra kesari 2023 येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ , जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरीस्पर्धेत नांदेडचा शिवराज राक्षे विजेता ठरला .

in article

या स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील व मुख्य कार्यवाहक अभिराम (दादा )पाटील व मान्यवरांच्या हस्ते नांदेडचा शिवराज राक्षे याला ६५ वा महाराष्ट्र केसरी किताब व महिंद्रा स्कॉर्पिओ आणि मोहोळ घरण्याकडून परंपरेने चालत आलेले चांदीची गदा देण्यात आली .
तर उपमहाराष्ट्र केसरी मल्ल नाशिक चा हर्षवर्धन सदगीर याला मान्यवरांच्या हस्ते महिंद्रा 575 DI व लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ या वर्षी पासून देण्यात आलेले चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले .
धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावरील गुरुवर्य के.टी पाटील सर (बप्पा ) क्रीडा नगरीमध्ये दि. 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या ६५ महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे अख्या राज्याचे लक्ष लागले होते , या वर्षी चा महाराष्ट्र केसरी कोण याचे उत्तर आज झालेल्या लढतीत सर्वांना मिळाले .
आज झालेल्या रुस्तुम-ए – हिंद हश्चिचंद्र बिराजदार आखाड्यावर रंगलेल्या उपांत्य चुरशीच्या लढतीत नांदेडाचा शिवराज राक्षे व मुंबई पाश्चिम उपनगराकडून खेळणारा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात गादी गटात चुरशीची लढत झाली , या एकतर्फी लढतीत 6 – 0 गुणांने नांदेडचा शिवराज राक्षे विजयी झाला.
तर माती गटात झालेल्या हिंगोलीचा गणेश जगताप विरुद्ध नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झालेल्या लढतीत 2-6 ने नाशिकचा हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली .
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीसाठी नाशिकचा हर्षवर्धन सदगीर व नांदेडचा शिवराज राक्षे या दोन मल्लानी बाजी मारत शेवटच्या अंतिम कुस्तीमध्ये दोन्ही पैलवानांनी धडक मारली .
यानंतर २० मिनिटांच्या विश्रांतीनंतर या दोन मल्लांची कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी श्वास रोखून धरला होता .
या अटीतटीच्या लढतीकडे अख्या महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमींचे लक्ष लागले होते , शेवटच्या या अंतिम लढतीत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध नाशिकचा हर्षवर्धन सदगीर या मल्लात झालेल्या मॅटवरील कुस्तीत या 6-0 गुणांनी नांदेडचा शिवराज राक्षे या पैलवानाने प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब पटकावला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here