कडा,आष्टी,डोईठाण सह तालुक्यात मराठा आरक्षणासाठी चक्का जाम

 

kunbi andolan  कडा,आष्टी,डोईठाण सह तालुक्यात मराठा आरक्षणासाठी चक्का जाम

in article

कडा

kunbi andolan मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी बीड जिल्ह्यात  विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन आज करण्यात आली.कडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डोईठाण येथे नगर बीड महामार्गांवर आष्टी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी आणि आंतरवाली सराटा येथील आंदोलनकर्ते  मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हे  चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग कल्याण बीड डोईठान्   येथे मराठा समाज बांधव यांच्या वतीने रोडवर टायर जाळून घोषणा येत आंदोलन करण्यात आले आहे
जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत तो पर्यंत आम्ही माघे हटणार नाहित आसा पवित्रा समाज बांधव यांनी घेतला आहे.आष्टी,कडा,डोईठाण, धामणगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .

सकाळी दहा वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली.सकाळी अनेक वाहने अडकून पडली होती. शांततेचे मार्गाने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या मध्ये रमजान तांबोळी, अनिल ढोबळे, संजय ढोबळे, अशोक ढवन , रवी ढोबळे, बाळासाहेब कर्डीले, बिपीन भंडारी, दीपक गरुड आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here