आग विझवण्याच्या फायरबॉल गोडाऊनला आग दोन जणांचा होरपळून मृत्यू

 jamkhed news
 jamkhed news

 

जामखेड प्रतिनिधी

in article

jamkhed news जामखेड नगर रोडवरील आग विझवण्याच्या फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊनमध्ये कामगार काम करत असताना लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ज्ञानेश्वर चंद्रकात भोडवे ,वय ४५ घोडेगाव.ता.जामखेड व जहीर सत्तार मूलानी ,वय ३५ रा तेरखेडा. ता कळंब आशा दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी जामखेड येथील नगररोड वरील सावळेश्वर ट्रॉक्टर च्या मागिल बाजुस मालक पंकज शेळके यांचा रेडमॅटीक ऑटोमॅटीक फायर फायटर चे उत्पादन करण्याचे (आग विझवण्याचे साधन) चे दोन वर्षापासून गोडाऊन आहे.

या आग विझवण्याच्या फायरबॉल गोडाऊन मध्ये आज दि १३ मे रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास कामगार ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे व जहीर सत्तार मुलानी हे दोन कामगार काम करत होते तर इतर दोघे गोडाऊन च्या बाजुला थांबलेले असताना अचानक या गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यानंतर जेसीबी च्या सहाय्याने या गोडाऊनला पाठीमागून भगदाड पाडण्यात आले.

PM Kisan youjna government scheme update new शेतकऱ्यांनासठी आनंदाची बातमी 4000₹ चा हप्ता या दिवशी जमा होणार

या नंतर या गोडाऊन मधुन धुराचे मोठे लोळ बाहेर येत होते. तसेच आत मध्ये आसलेल्या फायरबॉल चे आगीमुळे स्फोट होत होते. या स्फोटांच्या अवाजाने आजुबाजूचे लोक धावत बाहेर आले मात्र धुराचा लोळ प्रचंड होता व अधुन मधुन होणारे स्फोट यामुळे कोणासही गोडाऊन मध्ये आत जाता आले नाही.

या घटनेनंतर जामखेड jamkhed  नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला तातडीने बोलावण्यात आले .अग्निशामक दल व आजुबाजुला जमलेल्या नागरीकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आखेर दिड तासा नंतर आग आटोक्यात आणली.

यानंतर गोडाऊन आतमध्ये जाऊन पाहीले असता या आगीत ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे व जहीर सत्तार मुलानी आसे दोन जणांचा जाग्यावरच होरपळून मुत्यू झाला .तर इतर बाजुला आसलेल्या गणेश पवार रा.जामखेड व पुजा पठाडे वय २४ असे दोन जण जखमी झाले.

घटनेची माहिती मा. सरपंच सुनील कोठारी व संदेश कोठारी यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी कोठारी यांना दिली. यानंतर संजय कोठारी तातडीने जखमींना आणण्यासाठी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले होते.

त्याच बरोबर अग्नीशामक दलाचे जवान अय्याज शेख ,विजय पवार, अहमद सय्यद ,पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, अनिल भारती व त्यांचे सहकारी ,शंकर बोराटे,दिपक भोरे, तनवीर मुलानी, निखिल कुमकर, गोकुळ जाधव, सनी सदाफुले, बापु गायकवाड, विशाल ढवळे, सुनील मोरे सह अनेक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व त्यांच्या सहकार्‍यांनी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here