Crop Insurance Onlineपिक विमा असा करा Online अर्ज :

- Advertisement -
- Advertisement -

Crop Insurance Onlineपिक विमा असा करा Online अर्ज :
प्रधानमंत्री फसल बिमा योजना केंद्र सरकारने चालू केली आहे .या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा साठी अर्ज मागवले जातात. योजनेमध्ये शेतकऱ्याचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झाले असेल, शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जातात. यामध्ये आपल्याला शेतामध्ये पिकवलेल्या पिकाची सर्व माहिती द्यावी लागते .आपण अर्ज विमा ॲप द्वारे सुद्धा करू शकतो. पीक नुकसान भरपाई नुसार सरकार विमा यादी ऑनलाईन जाहीर करते . विमा यादी चेक करण्यासाठी आपण पिक विमा ॲप तसेच अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन यादी चेक करू शकतो .यापूर्वी विमा भरण्यासाठी काही पैसे भरावे लागत असत परंतु सरकारने यावर्षी एक रुपयात पिक विमा जाहीर केला आहे.

विमा भरा ऑनलाइन घरबसल्या
मित्रांनो आपण आता घरबसल्या विमा भरू शकतो. विमा यादी ऑनलाईन तपासणी अगदी सोपे झालेले आहे .चला तर पाहूया पिक विमा घरबसल्या कसा भरायचा ?

Google वरती जाऊन अधिकृत वेबसाईटला भेट द्या .
⇒होमपेज वरती आपल्याला FARMER CORNER दिसेल त्यावर क्लिक करा.
आपल्या समोर दोन पर्याय दिसतील login farmer व guest farmer यापैकी Guest Farmerवरती क्लिक करा.
⇒आपल्यासमोर Farmer details ,Residential details, Account details, Farmer id इत्यादीसाठी अर्ज ओपन होईल. तो पूर्ण भरून घ्या. Code इंटर करा व Create User बटन वरती क्लिक करा. आपले खाते उघडले आहे आपल्याला समोर दिसेल.
आपल्याला पुन्हा एकदा वेबसाईटच्या Home Page वर यायचं आहे. Farmer Corner वरती क्लिक करा .
⇒Login For Farmer वरती क्लिक करा .
⇒मोबाईल नंबर व कॅपच्या इंटर करण्यासाठी पेज ओपन होईल इंटर करा Request for otp क्लिक करा. आधार कार्ड व कॅपच्या भरून घ्या व Request for otpबटन वरती क्लिक करा.
विमा हेक्टर मध्ये भरला असेल तर आपणास सदरील योजनेचा पिक विमा हेक्टरी किती मिळेल, या संदर्भात माहिती भेटेल विमा ॲप द्वारे जमा विमा रक्कम आपण तपासू शकतो. चला तर जाणून घेऊया विमा यादी पिक विमा जमा रक्कम
पिक विमा
1)play store मध्ये जाऊन farmitra app download करा.
2)farmitra app वरती क्लिक करा.

आपल्यासमोर app पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला आपले पूर्ण नाव ,राज्य, जिल्हा, तालुका व मोबाईल नंबर एंटर करायचा आहे.

प्रधानमंत्री फसल बीमा योजना

4)Registration या बटन वरती क्लिक करा .
5)आपल्या मोबाईल वरती OTP येईल ओटीपी प्रविष्ट करा व Registration Button CLICK करा.
6)आपल्यासमोर FARMITRA APP चे होम पेज ओपन होईल खाली उजव्या बाजूला claim section वरती क्लिक करा .7)एप्लीकेशन स्थिती तपासा वरती क्लिक करा.
8)APPLICATION SEARCH व WITH BANK DETAILS SEARCH यापैकी एक ऑप्शन निवडा .आपण WITH BANK DETAILS SEARCH ऑप्शन निवडत आहोत पर्याय निवडल्यानंतर खाली दिलेली माहिती भरून घ्या.
9) दिलेले कोडे सोडवा व search बटन वरती क्लिक करा .
10)आपल्यासमोर विमा रक्कम दिसेल अशाप्रकारे आपण विमा हेक्टरी किती मिळेल विमा अॅप द्वारे तपासू शकतो.
मित्रांनो आपण या लेखांमध्ये पिक विमा योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा पिक विमा यादी मधील जमा रक्कम कशाप्रकारे मोबाईल ॲप द्वारे पहायची ? ही सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेतली.

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles