Homeताज्या बातम्याCar tracktor accident कार ऊसाच्या ट्रॅलीखाली घुसली, तीन ठार

Car tracktor accident कार ऊसाच्या ट्रॅलीखाली घुसली, तीन ठार

Car tracktor accident कार ऊसाच्या ट्रॅलीखाली घुसली, तीन ठार

अंबाजोगाई

Car tracktor accident  तालुक्यातील बर्दापूर जवळ  कार आणि ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मधे अपघात होऊन कारमधील तिघे ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बीड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या दोन पदरी रस्ता लागताच कार चालकाला समोरील ऊसाचा ट्रॅलीला रेडिएम नसल्याने आणि ट्राली न दिसल्यामुळे ट्राली  खाली कार घुसली . या घडलेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की, कारची समोरील बाजू चेंदामेंदा झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मयतांची नाव व गाव अद्याप समजले नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments