बुलढाणा
buldhana bogus soyabean seed news जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात खरीप हंगामात बोगस आणि सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८०० हून अधिक तक्रारी
या खामगाव तालुक्यातील पारखेड ,लांजुड , हिंगणा कारेगाव चितोडा, जवळपास खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आहेत.प्राप्त झाल्या असून त्यापैकी सर्वाधिक ३००तक्रारी
कृषी विभागाने आतापर्यंत ८०० हून अधिक बियाण्यांचे नमुने` प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
जिल्ह्यातून आतापर्यंत कृषी विभागाकडे बोगस किंवा सदोष बियाण्यांबाबत ८०० पेक्षा जास्त तक्रारी आल्याने त्याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातून सर्वाधिक ३०० तक्रारी आल्या असून, खामगाव तालुक्यातील पारखेड, नायदेवी, पिंपरी गवळी पिंप्राळा, हिवरखेड, कुंबेफळ, भालेगाव, पिंपळगाव राजा, निपाणा, उमरा लासुरा पळशी बुद्रुक पळशी खुर्द, या गावांना मोठा फटका बसला असून चिखली तालुक्यातील ४२ हेक्टरवरील सोयाबीन तर अजिबातच उगवले नाही. हरळी, अंचरवाडी, एकलारा, अमडापूर, कळद्रा या गावांतील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
खामगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असल्याने आमदार तथा कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर आक्रमक झाले असून त्यांनी
शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येची दखल घेत यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे.
ना. फुंडकर यांनी मंत्रालयात जाऊन राज्याचे कृषिमंत्री मा. दत्ता भरणे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी खामगाव तालुक्यातील बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कडक कारवाई करण्याची आणि बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे.
ना. फुंडकर म्हणाले, “शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा वाया जाऊ देणार नाही. दोषी कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना 100% भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.”
कृषी विभागाने तक्रार निवारण समिती स्थापन करून पंचनामे सुरू केले आहेत.
संशयित 12 कंपन्यांविरुद्ध चौकशी सुरू आहे.
शेतकऱ्यांना बियाण्याचे बिल आणि पिशवी जतन करून तातडीने तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे करत आहेत.

