बीड जिल्ह्यात वडवणी पोलिसांची मोठी कारवाई; गांजा लागवड प्रकरणी महिला आरोपी अटक

बीड गांजा लागवड प्रकरण जिल्ह्यातील वडवणी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गांजा लागवड करणाऱ्या एका महिला आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी छापा टाकून लाखो रुपयांचा गांजा जप्त केला असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील वडवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 18 मार्च 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा ढगाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.


माहितीनुसार, आशाबाई अंबादास शिनगारे (रा. लोणपाट) यांनी आपल्या मालकीच्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा राजीनामा


छाप्यामध्ये सुमारे 21.960 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 5 लाख 49 हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी गांजाची झाडे जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


या प्रकरणी आरोपी महिला आशाबाई शिनगारे यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास वडवणी पोलीस करत आहेत


ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत (IPS), अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles