नदीपात्रातील खड्ड्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू

Beed news
Beed news

 

 

in article

गेवराई

Beed news गेवराई तालुक्यातील शहजानपूर चकला येथील चार मुलांचा सिंदफणा  नदीपात्रातील खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली.हे सर्व मुले उसतोड कामगारांची असल्याचे कळते.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार हे चार मुले सिंदफणा नदी पात्रात पोहण्याच्या उद्धेशाने गेले असावेत. मात्र पाण्याचा आणि या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा.beed news paper या बाबत उशिरा नागरिकांना माहिती झाल्यानंतर त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याची नावे  बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे, अमोल संजय कोळेकर,असून हे सर्व  १२ वर्षापर्यंतचे  आहेत. सिंदफणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणवर  अवैध वाळू उपसा केला जातो. त्यामुळे नदी पात्रात मोठे खड्डे निर्माण झाले आहेत.या खड्ड्यात बुडून या चार मुलांचा मृत्यू झाला आहे.

Beed news चार बालकांचा खड्ड्यात बुडून  मृत्यू

 

दरम्यान marathi news beed मुलांच्या मृत्यूला कारणीभूत वाळू उपसा असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे असून , वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील कारवाई सुरु आहे.

 

मोबाईलच्या कारणाने मुलाचा खून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here